औरंगाबाद : राजकारणासाठी काहीही हे आपण नेहमीच पाहिलं आहे, मात्र राजकारणासाठी स्वतःच्या लेकीला स्वतःच मानलं नाही अशी एक घटना औरंगाबादेत घडली आहे. खंडपीठानं आदेश दिले आणि हा सगळा प्रकार उघड झाला. पिंपळवाडी तालुका पैठण येथील उपसरपंच मुनाफ शेख, याला 3 अपत्य आहेत मात्र उपसरपंच पदाची निवडणूक लढवताना त्यानं 2 अपत्य असल्याचं शपथपत्र दिल होत.
या विरोधात खंडपीठात बिलाल शेख याने याचिका दाखल झाली. कोर्टानं हि तात्काळ DNA टेस्ट करा असे आदेश दिले, असे आदेश देताच सरपंच साहेबांनी होय ती लेक माझीच असल्याची कबुली दिली आणि घोळ समोर आला. या खोट्या बोलणाऱ्या सरपंचाला आता कोर्टानं 5 लाखाचा दंड लावलाय. त्याचे पद रद्द करण्याचे आदेश दिलेत आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले आहेत.
5 लाखाची दंडाची रक्कम 3 लाख मुख्यमंत्री सहायता निधी, 1 लाख सरकारी हॉस्पिटल आणि 1 लाख कॅन्सर हॉस्पिटल ला देण्याचे आदेश दिले आहेत, राजकारणासाठी काहीही चा अतिशय विक्षिप्त प्रकार यामुळं समोर आलंय.