आजीला बाईकवर बसवलं, पंपावर पेट्रोल भरलं आणि मग... इंदपुरमध्ये भरदिवसा घडला धक्कादायक प्रकार

इंदापुरमध्ये भरदिवसा वृद्ध महिलेला लुटण्यात आले आहे. या आजींना चोरट्याने मारहाण देखील केली आहे. 

Updated: Jul 27, 2023, 10:25 PM IST
आजीला बाईकवर बसवलं, पंपावर पेट्रोल भरलं आणि मग... इंदपुरमध्ये भरदिवसा घडला धक्कादायक प्रकार title=

Pune Crime News :  भरदिवसा वयोवृद्ध आजीवर अज्ञाताचा हल्ला केल्याची धक्कादायक घटना इंदापूरमध्ये घडली आहे. अज्ञात व्यक्तीने बोलण्यात गुंतवूण अज्ञात स्थळी नेले यानंतर मारहाण करत लुटले आहे. जवळपास एक ते दीड लाखाचे दागिने चोरट्याने चोरले आहे. दिवसाढवळ्या झालेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. हा चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. इंदापूरात दिवसाढवळ्या वयोवृद्ध आजीवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. अज्ञात व्यक्तीने वयोवृध्द आजीला मारहाण करत आजीच्या गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिणे लुटले आहेत. रुक्मिणी पांडुरंग करगळ (वय 80 वर्ष) असे जखमी आजीचे नाव आहे.

रुक्मिणी या इंदापूर शहरातून गलांडवाडी नं- 1 कडे पायी चालत चालल्या होत्या.  यावेळी एका अज्ञात इसमाने चला मी तुम्हाला घरी सोडतो म्हणत बाईकवर बसवले. यानंतर या व्यक्तीने आधी पेट्रोल पंपावर बाईकमध्ये पेट्रोल भरले. यानंतर त्याने आजींना  निर्जन स्थळी नेत हात पायाला गंभीर मारहाण करून गळ्यातील, कानातील लाखो रुपयाचे सोन्याचे दागिने लुटले आहेत. या प्रकारामुळे इंदापूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. 

पोलीस असल्याचा बनाव करून वृद्ध शेतकऱ्याला लुटले

परभणीच्या जिंतूर शहरात पोलीस असल्याचा बनाव करून एका ठिकाणे वृद्ध शेतकऱ्यास दहा हजारने लुटल्याची घटना घडली आहे. जिंतूर तालुक्यातील राख येथील नारायण तात्याराव राख यांना या भामट्याने लुटलय केली आहे. या शेतकऱ्यांने जिंतूर येथील मोंढ्यातील आडत दुकानातून उचल घेतली होती, तो बाहेर निघाला बाहेर येताच त्याची विचार पुस करन्याच्या बहाण्याने त्या शेतकर्याने बाजूच्या गल्लीत नेले आणि त्याच्या कडून सर्व पैसे काढून घेतले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. त्या वर आता काय कारवाई होणार ते पाहावे लागेल.

गोळीबारात दोघांचा मृत्यू

नंदुरबार जिल्हातील शहादा तालुक्यातील मालगाव येथे शेतीच्या वादातून गोळीबार दोघांचा मृत्यू झाला आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसर हदरून गेला आहे. गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मलगाव येथे शेतीच्या वादातून थेट गोळीबार झाला. यात दोन जणांचा मृत्यु झाला असून चार जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अविनाश सखाराम खर्डे असे तीस वर्षीय मयत व्यक्तीचे नाव आहे. सखाराम खरडे या 54 वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या घटनेत तुकाराम कलजी खरडे, गणेश दिवान खरडे आणि पुनीत राजेंद्र पावरा हे गंभीर जखमी झाले आहेत. शेती खेडण्याच्या वादातून मलगावच्या पिपलीपाडा येथे दोन परिवारांमध्ये हा वाद झाल्याचे बोलल्या जात आहे. या वादातूनच थेट गावठी कट्यांतून दोन राऊंड फायरींग करण्यात आले. यातील एकाचा गोळी लागून जागीच मृत्यु झाला तर दुसरी गोळी लागलेल्या व्यक्तिला उपचारासाठी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. बंदुकीसोबतच या वादात तलवारीचा देखील वापर करण्यात आला आहे. तीन जण गंभीर जखमी असून यातील एकाची प्रकृती गंभीर असून यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालायात हलविण्यात आले आहे.