आनंदवारी: तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दुसरं रिंगण इंदापुरात

दरम्यान, माऊलींची पालखी आज फलटणहून बरडकडे मार्गस्थ झालीये. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बरडमध्येच असेल. 

Updated: Jul 16, 2018, 01:57 PM IST
आनंदवारी: तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दुसरं रिंगण इंदापुरात title=

इंदापूर: जगदगुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दुसरं रिंगण इंदापुरात उत्साहात पार पडलं. तत्पूर्वी इंदापूरवासियांनी पालखीचं मोठ्या उस्ताहात स्वागत केलं. कदम विद्यालयाच्या प्रांगणात हा रिंगण सोहळा पार पडला. यावेळी वरुणराजानंही अधुनमधून हजेरी लावली. या पावसानं वारकऱ्यांच्या उत्साहात आणखीनच भर पडली. वारीदरम्यान चालून आलेला थकवा, शीण घालवण्यासाठी रिंगण सोहळे आयोजित केले जातात, आणि यामुळं वारकऱ्यांच्या उत्साहात वाढच होते.

पालखीचा आजचा मुक्काम बरडमध्ये

दरम्यान, तुकोबारायांच्या पालखीचा आजचा मुक्काम इंदापुरातच असेल. लाखो वारकऱ्यांबरोबर समस्त इंदापुरकरांनी तुकोबारायांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय. तर माऊलींची पालखी आज फलटणहून बरडकडे मार्गस्थ झालीये. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बरडमध्येच असेल. 

ज्ञानोबा माऊलींची पालखीही मार्गस्थ

दरम्यान, महाराजांच्या पालखीच्या गोल रिंगण सोहळ्यात अबालवृद्ध वारकरी पताका, विणा, टाळ आणि मृदंघ घेऊन मोठ्या उत्साहात सहभागी होतात. महिला वारकऱ्यांनी डोक्यावर तुळस घेऊन रिंगणस सोहळ्यात सहभाग घेतात.

पालखी तळाचे होणार सुशोभिकरण

दरम्यान, राज्य शासनानने आता तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजने अंतर्गत पालखी तळ सुशोभिकरणाचं काम हाती घेतल आहे. भंडीशेगाव इथे घडीव आकर्षक दगडापासून भव्य असा पालखी तळ  बनव्यात येत आहे. दोन्ही पालखी तळाच्या प्रवेश ठिकाणी आकर्षक अशा स्वागत कमानी बनवण्यात आल्या आहेत. या दोन्ही पालखी तळाच्या स्वच्छतेचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं प्रांताधिकारी सचिन ढोल यांनी सांगितलंय. पालखी तळावर भाविकासाठी अतिरिक्त कायमस्वरूपी शौचालयाची उभारणीही करण्यात आली आहे.