आंबोलीत सापडलेला मृतदेह अनिकेत कोथळेचाच - डीएनए टेस्ट

चोरीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळेला अटक करून पोलीस कोठडीत मारहाण करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 6, 2017, 03:13 PM IST
आंबोलीत सापडलेला मृतदेह अनिकेत कोथळेचाच - डीएनए टेस्ट title=

सांगली : चोरीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळेला अटक करून पोलीस कोठडीत मारहाण करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे.

आंबोलीत सापडलेला मृतदेह अनिकेत कोथळेचाच असल्याचं डीएनए चाचणीच्या अहवालात स्पष्ट झालं आहे. हा रिपोर्ट सीआयडीला मिळाला आहे. सांगली-कोल्हापूर रस्त्यावर अभियंत्याला चाकूचा धाक दाखवून लुटल्याच्या प्रकरणात ६ नोव्हेंबरला अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारी यांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली होती. यानंतर पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह त्यांच्या साथीदारांनी कोठडीत मारहाण करून अनिकेतचा खून केला. 

७ नोव्हेंबरला आंबोलीत कामटेनं अनिकेतचा मृतदेह दोनदा जाळून त्याची विल्हेवाट लावली. आता डीएनए चाचणीचा अहवाल सीआयडीला मिळाला असून तो मृतदेह अनिकेतचाच असल्याचे अहवालावरून स्पष्ट झालं आहे. याबाबत सीआयडीकडून अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.