वर्धा : हल्ली लग्नांचे मौसम आहेत सगळीकडे सनई चौघडे आपल्याला ऐकायला मिळतात. पण
अशातच वर्ध्यातील एका कुटुंबावर मात्र भर मंडपात रडण्याची वेळ आली. कारण ही तसंच काहीस झालं. लग्न लागायला अगदी काहीशी घटीका राहिली होती. सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाच वातवरण असताना लग्न मंडपातून नवरी मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याची चर्चा सुरू झाली. आणि अगदी रंगाचा बेरगं झाला. वधु पक्षाप्रमाणेच वराच्या कुटुंबियांनी देखील डोक्याला हात लावला.
तीन महिन्यापूर्वी कळसकर कुटुंबियांनी या वधुला पाहिले आणि अगदी ठरवलेल्या लग्नाचे विधीवत सोहळा ठरला. ठरलेल्या मुहूर्ताला लग्नाची तयारी देखील झाली. मात्र ऐनवेळी वधूने आपल्या प्रियकरासोबत पलायन करून सर्वांना दुःख दिलं. आर्वीतील नवरदेव गजानन कळसकर याचं लग्न यवतमाळातील एका मुलीसोबत ठरलं. अगदी ठरलेल्या दिवशी वधु लग्नमंडपात पोहोचली देखील. मात्र लग्न लागण्याच्या वेळी ती नवरी पळून गेली. या घटनेने दोन्ही कुटुंबिय हतबल झाले. लग्न घरी रंगाचा बेरंग झाला. मात्र परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबियांनी घेतला.
ही मुलगी पाहण्याअगोदर ज्या मुलीला या नवरदेवाने पाहिले होते तिच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला. त्या वेळी संयम पाळून त्या मुलीने देखील लग्नाला तात्काळ होकार कळवला. बुलढाण्यापासूनचं अंतर पूर्ण करत सात तासांनी लग्न मंडपात ती नववधू पोहोचली. नववधू ज्योती लग्न मंडपी पोहोचताच एक वेगळाच उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रात्री ज्योती आणि गजानन याचा विवाह उरकण्यात आला.
नव वधुने लग्नाला तात्काळ होकार दिल्यामुळे सासरच्यांनी तिचं कौतुक केलं. तसंच या लग्नाची संपूर्ण वेशीत भरपूर चर्चा झाली.