विशेष नक्षलविरोधी पथकाला गडचिरोलीमध्ये मोठं यश

राज्याच्या विशेष नक्षलविरोधी अभियान पथकाला गडचिरोलीमध्ये मोठं यश मिळालं आहे. 

Updated: Aug 14, 2017, 03:01 PM IST
विशेष नक्षलविरोधी पथकाला गडचिरोलीमध्ये मोठं यश title=

गडचिरोली : राज्याच्या विशेष नक्षलविरोधी अभियान पथकाला गडचिरोलीमध्ये मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवरच्या नारायणपूर जिल्ह्यातल्या अबुजमाड भागात ही कारवाई करण्यात आली. 

तुंडेवारा आणि कुपनार गावाजवळच्या जंगल परिसरात १२ ऑगस्ट रोजी नक्षलविरोधी अभियान राबवत असताना पोलीस आणि नक्षलींत चकमक उडाली. या चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावर शोधमोहीम राबवून नक्षलींची हत्यारं, तसंच नक्षली साहित्य जप्त केलं. 

विशेष म्हणजे पहिल्यांदाच चकमकी दरम्यान नक्षलींकडचे घोडे जप्त करण्यात आले. या भागात भुपतीसारख्या वरिष्ठ नक्षल्यांचा वावर असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या महिनाभरात पोलिसांनी जिवाची पर्वा न करता जोरदार कारवाई करत ४ नक्षलींना कंठस्नान घातलं आहे. विशेष म्हणजे नक्षलींकडून पाळण्यात आलेल्या नक्षल सप्ताहाला प्रथमच मोठ्या प्रमाणात आदिवासींनी विरोध केला. त्या पार्श्वभूमीवर ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.