सातारा : भारतीय लष्कराच्या बांगलादेश मुक्ती संग्रामातील देदीप्यमान विजयाप्रीत्यर्थ कराडमध्ये गेल्या २० वर्षांपासून विजय दिवस समारोह समितीकडून विजय दिवस साजरा केला जातो.
या समारोहाला शनिवारी सकाळी सुरुवात झाली आहे. कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, निवृत्त कर्नल संभाजी पाटील, माजी नगरसेवक अरुण जाधव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शस्त्र प्रदर्शनास प्रारंभ झाला आहे.
मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे जवान भारतीय बनावटीचे ५.५६ लाईट मशिन गन, ४० एमएम मल्टी शॉट ग्रेनेड लाँचर, तसेच भारतीय लष्कराच्या ताफ्यातील शस्त्रांसह या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.
रणगाडा भेदणारे रॉकेट लाँचर या प्रदर्शनाचं आकर्षण ठरत आहे.
सातारा | बांगलादेश मुक्ती संग्रामाची विजयी आठवण