आर्मीच्या एका हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग

अंबडमधील नागझरी शिवारात आर्मीच्या एका हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

Updated: Aug 7, 2017, 09:47 PM IST
आर्मीच्या एका हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग title=

जालना : अंबडमधील नागझरी शिवारात आर्मीच्या एका हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. आज सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास हे लँडिंग करण्यात आलं, मात्र अचानक हेलिकॉप्टरच लँडिंग करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी हेलिकॉप्टरकडे धाव घेतली. 

अचानक हेलिकॉप्टरचं लँडिग का करण्यात आलं याचं कारण मात्र समजू शकलं नाही. या हेलिकॉप्टरमध्ये ३ जवान होते,१० मिनिटे हेलिकॉप्टर थांबल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टर रवाना झालं.