बीड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथे बीडच्या पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना, पालकमंत्री मात्र विदेशात अदृश्य झाल्या असल्याचा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला.
तर लातूरचे पालकमंत्री संभाजी निलंगेकर यांनी रात्री केलेल्या दुष्काळ पाहणीचीही त्यांनी खिल्ली उडवली. राज्य सरकार दुष्काळाच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचंच यातून दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
जनसंघर्ष यात्रेच्या दबावामुळे सरकारला दुष्काळ जाहीर करावा लागला. हे जनसंघर्ष यात्रेचे यश आहे.
राज्यात २०१ तालुक्यातील २० हजार गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. सरकारने फक्त १५१ तालुक्यातच दुष्काळ जाहीर केला आहे. बाकीच्या ५० तालुक्यात दुष्काळ केव्हा जाहीर करणार? pic.twitter.com/MooZw3ruGC— Ashok Chavan (@AshokChavanINC) October 31, 2018