अशोक चव्हाण यांनी घेतली राजू शेट्टी यांची भेट

या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा झाली.

Updated: Dec 3, 2017, 10:05 AM IST
अशोक चव्हाण यांनी घेतली राजू शेट्टी यांची भेट title=

नांदेड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने या भेटीकडे पाहिले जात आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा झाली.

शेतकरी प्रश्न 

२०१४ च्या निवडणुकीत भाजपा आघाडीत सहभागी झालेल्या राजू शेट्टी यांनी आता भाजपाशी फारकत घेतली असून ते शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात आक्रमक आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षानेही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन केले आहे.

सरकारविरोधात आघाडी ?

या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीमुळे हे दोन्ही पक्ष शेतकर्‍यांच्या प्रश्नावर एकत्र येऊन सरकारविरोधात आघाडी उघडतील की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. 

सरकारची डोकेदुखी वाढणार

यापूर्वी राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शेतकरी प्रश्नावर एकत्र येऊन नाशिक येथे शेतकरी मेळावा घेतला होता.

नागपूरचे हिवाळी अधिवेशन तोंडावर असताना सरकार विरोधात असलेले सगळे पक्ष एकवटत असल्याने सरकारची डोकेदुखी निश्चितच वाढणार आहे.