close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गणेश नाईकांचा ४८ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गणेश नाईक यांनीही बुधवारी संध्याकाळी भाजपात प्रवेश केला. 

Updated: Sep 11, 2019, 08:38 PM IST
गणेश नाईकांचा ४८ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश

मुंबई : हर्षवर्धन पाटील यांनी आजच भाजपात प्रवेश केला त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गणेश नाईक यांनीही बुधवारी संध्याकाळी भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित भव्य प्रवेश सोहळ्याला खासदार कपिल पाटील आणि आमदार मंदा म्हात्रे हे देखील उपस्थित होते.

गणेश नाईकांसोबत त्यांचे चिरंजीव, माजी खासदार संजीव नाईक आणि नवी मुंबई महापालिकेतल्या राष्ट्रवादीच्या ५७ पैकी ४८ नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला. त्यामुळं राष्ट्रवादीची नवी मुंबई महापालिकेतील सत्ता संपुष्टात आली असून, नवी मुंबई पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकण आहे.

'भाजपाशिवाय पर्याय नाही'

आजचा दिवस हा माझ्यासाठी ऐतिहासिक असून आता भाजपाशिवाय पर्याय नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. राज्यात पाच वर्षे आपण मुख्यमंत्र्यांचे कणखर नेतृत्व पाहीले, दुष्काळ - पूर याठिकाणी लोकांनां मदत मिळाल्याचे ते म्हणाले. आमच्यावर जो अन्याय झाला आहे त्यांना मदत करावी अशी अपेक्षा हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केली. 

हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हर्षवर्धन यांनी योग्यवेळी पक्षप्रवेश केला. एन अनुभवी नेता असल्याने पक्षाला बळकटी येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन यांचे कौतुक केले.