लातूरमध्ये भाजपाकडून अर्चना चाकूरकर रिंगणात ?

अर्चना पाटील चाकूरकर भाजपाकडून निवडणूक लढणार असल्याची चर्चा 

Updated: Oct 7, 2019, 04:27 PM IST
लातूरमध्ये भाजपाकडून अर्चना चाकूरकर रिंगणात ?  title=

शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर : लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख यांच्याविरोधात काँग्रेस नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर भाजपाकडून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेला अद्यापपर्यंत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अर्चना यांच्या उमेदवारीसाठीच अद्याप भाजपने लातूर शहरची उमेदवारी घोषित केलेली नाही असेही बोलले जात आहे. त्यामुळे अशी लढत झालीच तर लातूर जिल्ह्यासह राज्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. 

लातूर शहर मतदारसंघात लिंगायत समाज बहुसंख्येने आहे. त्यामुळेच काँग्रेसचे मराठा समाजातील उमेदवार अमित देशमुख यांना कात्रीत पकडण्यासाठीच जातीय गणिते आखून भाजपाने ही खेळी केली असल्याचेही जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतरच या चर्चेला पूर्णविराम मिळणार असून भाजपची उमेदवारी कुणाला मिळते याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे.