कणकवलीतून नितेश राणे भाजपाचे उमेदवार

कणकवली विधानसभेच्या जागेवर नितेश राणे भाजपाकडून लढणार 

Updated: Oct 2, 2019, 07:49 AM IST
कणकवलीतून नितेश राणे भाजपाचे उमेदवार title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, कणकवली : कणकवली विधानसभेच्या जागेवर नितेश राणे भाजपाकडून लढणार हे स्पष्ट झाले आहे. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम न करताच भाजपा त्यांना एबी फॉर्म देणार आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच नितेश राणे यांनी आपल्या ट्विटरवरून 'काही तास बाकी' असे ट्विट केले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचं घोड अजून अडलेलंच आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला जात आहे. राणेंच्या भाजपा प्रवेशाला शिवसेनेचा जोरदार विरोध आहे. त्यामुळे राणेंसमोर आव्हान उभे राहीले आहे. २ ऑक्टोबरला आपण भाजपा प्रवेश करु असे राणेंनी नुकतेच जाहीर केले होते. पण आजही तशी शक्यता दिसत नाही.  राणेंनी मुख्यमंत्र्यांसोबत जवळपास अर्धा तास चर्चा केली. भाजपामधील लांबलेल्या प्रवेशाबाबत ही चर्चा झाल्याचं समजतंय. या चर्चेत नेमकं काय झालं यातून राणे परिवाप राणेंनंतर संजीव नाईक, गणेश नाईक यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

नितेश राणे हे सध्या आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्यक्त होताना दिसत आहेत. 'जेव्हा लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतील तेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं केलंय' अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते. त्यानंतर पुन्हा एक ट्विट त्यांनी केले आहे. यामध्ये काही तास बाकी ( वादळापुर्वीची शांतता) असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

नितेश राणे यांना भाजपचा एबी फॉर्म मिळणार आहे. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम न करताच भाजपकडून नितेश राणे यांना थेट एबी फॉर्म देण्यात येणार आहे.
नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाली. मात्र कणकवलीतून निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवण्यासाठी मुख्यमंत्री यांचा ग्रीन सिग्नल त्यांना मिळाला आहे. 

दरम्यान नारायण राणे यांचा प्रवेश मात्र अजूनही लांबणीवरच दिसत आहे. केवळ एक जागा राणेंना मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.