भाजपाकडे उमेदवारीसाठी डोळे लावून बसलेले भारत भालके राष्ट्रवादीत ?

काँग्रेस आमदार भारत भालके यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Updated: Sep 30, 2019, 05:00 PM IST
भाजपाकडे उमेदवारीसाठी डोळे लावून बसलेले भारत भालके राष्ट्रवादीत ?  title=

मुंबई : काँग्रेस आमदार भारत भालके यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस सोडल्यानंतर ते भाजपात जाणार अशी चर्चा होती. भाजपाकडून तिकीट मिळवण्यासाठी काँग्रेसच्या मुलाखतीकडे पाठ फिरवली होती. पण भाजपाकडे उमेदवारीसाठी डोळे लावून बसलेल्या भारत भालकेचीं गोची झाल्याने ते आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. 

भाजपामध्ये जाणार ही चर्चा माध्यमांनी केले होती मी नाही. माझा प्रवेश नाकारलेला नाही असे भारत भालके यांनी म्हटले. आपण राष्ट्रवादीत जाणार ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे ते म्हणाले. सर्व छुप्या गोष्टी सांगायच्या नसतात असेही त्यांनी म्हटले. परिचारकांचं आव्हान असण्याचा प्रश्न नाही, त्यांना मी 9 हजार मतांनी हरवलंय असे भालके म्हणाले. 

आता भाजपचे तिकीट मिळत नसल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पण त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशा बाबत निश्चित माहीत समोर आली नाही. राष्ट्रवादी याबाबत काँग्रेसशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे समजते.