अकोला : सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करणारे देशभक्त असू शकतात का ? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे. देशहिताच्या मुद्द्यावर तरी किमान सगळ्याच राजकीय पक्षांची मतं एक असली पाहिजे आम्ही विरोधकाना विनंती केली, मात्र ही लोक मानायला तयार नाहीत. त्यांचा पक्षात कुणी उरलंय का, जे कुणी असेल ते या वेळी मतदान सुद्धा आम्हाला करणार आहेत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकात महाराष्ट्रातील जनतेने विरोधकाना संदेश दिलाय, मात्र विरोधकांना कळत नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. अकोला येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
काँग्रेसमध्ये आता नवा अध्याय सुरू झाला असं कळलं. आता काँग्रेसमध्ये राष्ट्रवाद शिकवणार, आता रडू की हसु कळत नाही, परिवार भक्ती मध्येच काँग्रेसची राष्ट्रभक्ती दिसते. म्हणून काँग्रेस आता शेवटचा श्वास घेतेय असेही ते म्हणाले.
मराठवाड्यासाठी अनेक घोषणा झाल्या, मात्र मराठवाड्याला काही मिळालं नाही. फक्त काही मूठ भर लोकांनी त्या पैशात स्वतःचा विकास केला. 3 मुख्यमंत्री मराठवाड्यातून झाले मात्र पायाभूत सुविधा सुद्धा मराठवाड्याला मिळाल्या नाहीत. या राष्ट्रवादीच्या घडीमध्ये 10: 10 वाजले आहेत म्हणजे दोघेजण मिळून केवळ 20 सीट जिंकणार अशी खिल्लीही पंतप्रधानांनी उडवली.
विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार मध्ये संपर्क हवा असतो. तुमच्या राज्य सरकारने केंद्रातून बरंच काही आणलंय. मराठवाडामध्ये होणारे वॉटर ग्रीड ही जलक्रांतीची सुरुवात आहे. यातून मराठवाड्याला मोठा लाभ होणार आहे. दुष्काळ मी जवळून पहिला आहे. पक्षात काम करताना, गुजरात मुख्यमंत्री असतांना मी अभ्यासाला आहे. लोकांची स्थलांतर पहिली आहेत. लोकांची पाण्यासाठी तडफड पहिली आहे, म्हणून देशाला जलयुक्त करण्याचं आमचं स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही साडे तीन लाख कोटी खर्च करणार आहोत असे आश्वासन त्यांनी दिले.