माझी शिकार करून दाखवा, रोहित पवार यांचं विरोधकांना आव्हान

अर्ज दाखल करण्याअगोदर रोहित पवार यांची अहमदनगरमध्ये भव्य रॅली आयोजित करून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं

Updated: Oct 3, 2019, 01:33 PM IST
माझी शिकार करून दाखवा, रोहित पवार यांचं विरोधकांना आव्हान  title=

जामखेड : विधानसभा निवडणूक २०१९ साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार आज नगर जामखेड इथून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पवार घरण्यातल्या तिसऱ्या पिढीतले रोहित पवार शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लोकसभा निवडणूक काळापासून सतत आजोबा शरद पवार यांच्यासोबत असणारे, तसंच प्रत्येक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया देत पक्ष तसंच पवार घराण्याची बाजू मांडणारे रोहित पवार यांच्या या पहिल्याच आमदारकीच्या निवडणुकीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. रोहित पवार यांची लढत मंत्री राम शिंदे यांच्याशी होत आहे.

अर्ज दाखल करण्याअगोदर रोहित पवार यांची अहमदनगरमध्ये भव्य रॅली आयोजित करून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.

'काही जण माझी शिकार करायला निघाले होते. शिकार करण्याशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नाही. पण आज शिकार करण्याचे दिवस नाहीत... आज लोकांना आणि जनावरांना जिवंत ठेवण्याचं दिवस आहेत... तरीसुद्ध त्यांना खरंच शिकार करायची असेल तर इथे येऊन त्यांनी माझी शिकार करून दाखवावी' असं म्हणत त्यांनी विरोधकांना थेट आव्हान दिलंय.

यावेळी, धनगर समाजाच्या वतीनं काठी आणि घोंगडं देऊन रोहित पवार यांचा सत्कारही करण्यात आला.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x