close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांना हे माहिती नसावं'

राजकारणातील कसलेल्या मल्लाचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार 

Updated: Oct 13, 2019, 08:33 PM IST
'मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांना हे माहिती नसावं'
फाईल फोटो

नितेश महाजन, झी २४ तास, जालना : 'आमचे उमेदवार तेल लावून उभे आहेत, मात्र समोरच्यांचे पैलवान मैदानात दिसत नाहीत' असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा समाचार 'राजकारणातील कसलेले मल्ल' आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलाय. 'मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे'चा अध्यक्ष आहे हे मुख्यमंत्र्यांना माहिती नसावं, अशा शब्दांत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय. 

'आमचे पैलवान तुम्हाला मैदानात दिसत नाही तर मग पंतप्रधानांना दिल्ली सोडून परतूरमध्ये प्रचारासाठी का यावं लागतं?' असा प्रश्नदेखील पवारांनी उपस्थित केलाय. 

'आम्ही तुम्हाला मैदानात दिसत नाही कारण आपण आम्ही तुमच्याशी नाही तर पैलवानांशी कुस्ती खेळतो' असा पलटवारदेखील शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. 

'अमित शाह हे नाव पाच वर्षांपूर्वी कुणी ऐकलं नाही आणि कुणी त्यांना पाहिलंही नाही. मात्र महाराष्ट्रात आल्यावर अमित शहा आणि नरेंद्र मोदी सर्वात अगोदर माझं नाव घ्यायला विसरत नाहीत' असा टोला शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना हाणलाय.