ऊस दरावर अंतिमत: तोडगा निघाला

ऊस दरावर अंतिमतः तोडगा निघाला आहे. FRP अधिक २०० रुपये देण्याला साखर कारखानदारांनी मंजुरी दिली आहे. हा तोडगा शेतकरी संघटनांनी मान्य केला आहे. 

Updated: Nov 5, 2017, 11:44 PM IST
ऊस दरावर अंतिमत: तोडगा निघाला title=

कोल्हापूर : ऊस दरावर अंतिमतः तोडगा निघाला आहे. FRP अधिक २०० रुपये देण्याला साखर कारखानदारांनी मंजुरी दिली आहे. हा तोडगा शेतकरी संघटनांनी मान्य केला आहे. 

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यामधे मध्यस्थी करत, ऊसदराचा प्रश्न मिटवला आहे. ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी कोल्हापुरातल्या सर्किट हाऊस इथं राज्याचे महसूलमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांची बैठक पार पडली.

चार तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि साखर कारखानदार आपापल्या म्हणण्यावर ठाम होते. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी FRP अधिक २०० द्यावा असा तोडगा साखर कारखानदारांना सुचवला. त्यावर साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सहमती दर्शवली.

मात्र हा तोडगा फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित असून, इतर ठिकाणच्या कारखानदारांनी अशाच प्रकरचा तोडगा काढावा असं आवाहन, खासदार राजू शेट्टी यांनी केलंय.