वसई : पोलिसांवर काल झालेल्या हल्ल्यानंतर आज भोईदापाडा परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. वालीव पोलिसांनी या प्रकरणा १८ जणांना अटक केली आहे. तर बिल्डराच्या ९ गाड्या तब्यात घेतल्या आहेत.
दरम्यान, आज अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्यात येणार नाही. ही कारवाई बंद रहाणार आहे. पुढच्या आठवड्यात ही कारवाई पुन्हा सुरु होईल. आज दिवसभर पोलिसांचा ताफा या भागात तैनात करण्यात आलाय.
वसईत अनाधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या पथकावर स्थानिकांनी तुफान दगडफेक केली. वसईच्या राजीवली वाग्रालपाडा परिसरात ही दगडफेक झाली. काल सकाळपासून या परिसरात वसई विरार महापालिकेची अनाधिकृत बांधकामावर तोडक कारावाई सुरू होती. यावेळी शेकडो घरं तोडल्यानंतर स्थानिकांनी अचानक दगडफेक सुरु केली. यावेळी पोलिसांनीही लाठीचार्ज केला.
तसेच दुसरीकडे झी मीडियाच्या कॅमेरात टँकर माफियांनी वसईच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु केल्याचं कैद झालंय. खाणीच्या डबक्यात साचलेलं पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरवण्याचा धंदा वसईतल्या टँकर माफियांनी सुरु केला आहे. या गलिच्छ पाण्यानं हजारो वसईकरांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. टँकर माफियांनी पैशासाठी सुरू केलेला हा प्रकार झी मीडियाच्या कॅमेरात कैद झालाय.