दिलासा! दहा दिवसांनंतर 'ती' महिला कोरोनातून पूर्णपणे बरी

दहा दिवसांपासून सुरु होते उपचार   

Updated: Mar 23, 2020, 09:29 PM IST
दिलासा! दहा दिवसांनंतर 'ती' महिला कोरोनातून पूर्णपणे बरी  title=
दिलासा! दहा दिवसांनंतर 'ती' महिला कोरोनातून पूर्णपणे बरी

मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येक राष्ट्राकडून काही महत्त्वाचे आणि तितकेच कठोर असे निर्णय घेण्यात येत आहेत. रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या अनेक रुग्णांचीसुद्दा प्रचंड काळजी घेण्यात येत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातही कोरोना फोफावत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. 

कोरोना पॉझिटीव्ह असणाऱ्या एका महिलेला रुग्णालयातून अखेर सुट्टी देण्यात आली आहे. गेले दहा दिवस या महिलेवर कोरोनासाठीचे उपचार सुरु होते. ज्यानंतर आता ती महिला पूर्णपणे बरी झाली असून, तिला सोमवारी दुपारी रुग्णालयातून सोडण्यात आलं. यावेळी या महिलेने देवाचे आणि डॉक्टरांचेही आभार मानले. कोरोनाच्या आव्हानावर मात करुन परतणाऱ्या महिलेच्या प्रकृतीमध्ये आलेली सुधारणा ही अनेकांनाच दिलासा देऊन गेली.

 

पुण्यातही आशेचा किरण 

९ मार्चला रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाच्या दोन रुग्णांचे सोमवारी घेण्यात आलेले सँपल हे निगेटीव्ह आले आहेत. दुबई प्रवास करून आलेल्या या दाम्पत्याला कोरोणाची लागण झाली होती. त्यांना पुण्यातील नायडू हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं. गेले १४ दिवस ते रुग्णालयात दाखल होते. आज म्हणजे सोमवारी त्यांचे सँपल NIVकडे पुन्हा तपासणी साठी पाठवण्यात आले, ते निगेटिव्ह आले आहेत.  उद्या पुन्हा एकदा सँम्पल पाठवले जातील ते देखील निगेटीव्ह आले तर या रुग्णांनाही निर्धारित प्रक्रियेनुसार रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे.