Crime News : पळून जाऊन लग्न अन् अवघ्या 3 महिन्यांचा संसार... प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट

Crime News : मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघांच्याही कुटुंबियांचा या लग्नाला विरोध केला. विरोध झुकारून दोघांनी पळून जाऊन लग्न केले मात्र याचा शेवट हृदयद्रावक झाला आहे

Updated: Jan 31, 2023, 06:17 PM IST
Crime News : पळून जाऊन लग्न अन् अवघ्या 3 महिन्यांचा संसार... प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट

Crime News : प्रेमविवाहानंतर (Love Marriage) अवघ्या तीनच महिन्यात तरुणीने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडलाय. तीन महिन्यांपूर्वी पळून जाऊन प्रेमविवाह करुन संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणीने राहत्या घरी गळफास घेत आपल जीवन यात्रा संपवली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी (Aurangabad Police) आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दुसरीकडे तरुणीच्या आईने आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या दोषींविरुध्द कडक कारवाई करण्याची केली आहे.

सोमवारी, औरंगाबादच्या (aurangabad) बजाजनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अंजली बिरेंद्रसिंग गौतम (20) असे या तरुणीचे नाव आहे. प्रेमविवाहानंतर अवघ्या तीन महिन्यांतच पती व सासरच्यांनी तरुणीला त्रास देणे सुरू केल्याने घरच्यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. यानंतर आईसह राहणाऱ्या अंजलीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली.

अंजली गौतम ही मूळची उत्तर प्रदेशातील कानपूरची होती. अंजलीच्या वडिलांचे 4 वर्षापूर्वीच अपघातात निधन झाले होते. यानंतर अर्चनाची आई गीता गौतम हिने एका कंपनीत काम करत मुलीचा सांभाळ केला. काही महिन्यांपूर्वी अंजलीची रोहित कारभारी आव्हाड या तरुणासोबत मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे 9 नोव्हेंबर 2022 रोजी पळून जाऊन लग्न केले. त्यानंतर काही दिवसांनी रोहित व अंजली वाळूज एमआयडीसीत परत आले.

मात्र काही दिवसांतच रोहित आणि अजंली यांच्यात वाद सुरु झाले. पती व सासरच्यांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाची अंजलीने आईला माहिती दिली. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात घरच्यांविरोधात तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी अंजली व रोहित यांचे समुपदेशन केले. मात्र, त्यानंतरही अंजली बजाजनगर येथे आईकडे गेली.

यानंतर सोमवारी अंजलीने आई कामावर गेली असताना गळफास घेत आत्महत्या केली. कामावर असलेल्या आईने अंजलीला फोन केला मात्र बराच वेळ तिने काहीच उत्तर दिले नाही. यानंतर अंजलीच्या आईने शेजाऱ्याकडे अंजलीबाबत चौकशी केली. यानंतर शेजाऱ्यांनी जाऊन पाहिले असता अंजलीने आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.