औरंगाबाद : एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना आता गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचं कंबरड मोडलं आहे. वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेने आंदोलन केलं आहे.
औरंगाबादमध्ये महागाई विरोधात शिवसेना महिला आघाडीनं आंदोलन केलं. गेल्या काही दिवसांपासून महागाई वाढतेय. पेट्रोल आणि डीझेलचे दर वाढत चाललेत. त्यामुळे त्याचा परिणाम सर्वच वस्तूंवर होतोय.
गॅसचे दर वाढल्यानं आता चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ महिलांवर येणार असल्यानं शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल पेटवून निषेध केला.
भाजीपाल्याचे दर गगनाला भिडत असल्याने सवर्सामान्य महिलांचे आर्थिक गणित बिघडत चाललं आहे. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर भाजी विकत आपला रोष व्यक्त केला.