मुंबई : काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधून (aurangabad) बेपत्ता झालेल्या यूट्यूबर 'बिंदास काव्या'च्या (bindass kavya) प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. यूट्यूबर (youtuber) 'बिंदास' काव्या (bindass kavya) काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधून गायब झाली होती. त्यानंतर ती मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इटारसी येथे सापडली. इटारसी रेल्वे पोलिसांनी यूट्यूबर काव्याला (youtuber bindass kavya) ताब्यात घेत तिच्या पालकांकडे सोपवलं होतं. मुलगी सुरक्षित असल्याचे तिच्या पालकांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होतं. (aurangabad youtuber Bindas Kavya ran away from home to increase social media followers)
याप्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. यूट्यूबर काव्याच्या (bindass kavya) गायब होण्यामागे तिने आणि तिच्या घरच्यांचीच योजना होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. काव्या आणि तिच्या कुटुंबाने फॅन फॉलोअर्स (followers) वाढवण्यासाठी गायब होण्याचा बनाव रचल्याचा खुलासा झाला आहे.
सोशल मीडियावर (social media) जितके जास्त फॉलोअर्स (followers) तितकी पैसे कमावण्याची संधी जास्त असा ट्रेण्ड सध्या सुरु आहे. त्यामुळे काव्या आणि तिच्या कुटुंबियांनी फॉलोअर्स (followers) वाढवण्यासाठीच हा प्रकार केल्याची माहिती बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा अॅड. आशा शेरखाने-कटके यांनी दिली आहे.
आशा शेरखाने-कटके म्हणाल्या की, दर्जाहीन प्रसिद्धीसाठी (publicity) पोलीस, रेल्वे, बाल न्याय मंडळ या यंत्रणांना वेठीस धरलं गेलं. हा सर्व घटनाक्रम पूर्वनियोजित होता, असं स्पष्ट होतं. नागरिकांना भावनाविवश करून लाइक करण्यास भाग पाडलं गेलं. प्रसिद्धीसाठी यंत्रणेस वेठीस धरणे योग्य नसल्याचं आशा शेरखाने-कटके म्हणाल्या.
सोशल मीडियावर बिंदास काव्या हे सोशल मीडियावर प्रसिद्ध नाव आहे. 'बिंदास काव्या' या यूट्यूब चॅनलमुळे (YouTube) चाहते काव्याला ओळखतात. YouTuber तिच्या गेमिंग कौशल्यांसाठी, YouTube च्या लिप सिंकसाठी ओळखली जाते. काव्या मूळची औरंगाबादची असून वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तिची फॅन फॉलोइंग (fan following) चांगली आहे. काव्या तिच्या चॅनलवर व्लॉग चालवते.
9 सप्टेंबरला गायब झाली होती काव्या
काव्या घरातून गायब झाल्यानंतर व्हिडिओद्वारे तिच्या वडिलांनी सांगितले की, मुलगी त्यांच्यावर रागावून लखनऊला जात होती. मात्र, पोलिसांना काव्या इटारसीमध्ये सापडली आहेत. 9 सप्टेंबर रोजी काव्याच्या पालकांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की त्यांची मुलगी बेपत्ता झाली आहे, त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं होतं.
दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर काव्याने तिच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट करून सर्वांची माफीही मागितली होती. तिच्या या व्हिडीओमध्ये काव्याने सांगितले की, आता ती अशी घरातून बाहेर पडणार नाही.