Badlapur Case Mumbai Pune Train Cancelled : बदलापुरातील नामांकित शाळेत 4 वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतापाचा उद्रेक पहायला मिळाला.. संतप्त पालक आणि नागरिकांनी रेल्वे आणि रस्ते वाहतूक अडवून धरली.. बदलापूर रेल्वे स्थानकात संतप्त पालकांनी रेल रोको आंदोलन केलंय. त्यामुळे बदलापूर-कर्जत रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. याचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसला आहे. रोज मुंबई पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. लांब पल्ल्या एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक लांब पल्ल्या एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहे. यामुळे पुणेकर मुंबईत अडकल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
सकाळी 10 वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकात संतप्त पालकांनी आंदोलन सुरु आहे. अगदी सुरुवातीला बदलापूरकरांनी शाळेबाहेर गर्दी केल्यानंतर काही वेळात बदलापूरकरांनी रेलरोको करत रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी केली आहे. आंदोलकांनी रेल्वे ट्र्रॅक अडवून धरला आहे. यामुळे बदलपूर रेल्वे स्थानकाच्या पुढे रेव्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते अंबरनाथ पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर विशेष लोकल सोडल्या जात आहे. लोकल ट्रेन प्रमाणेच लांब पल्ल्या एक्सप्रेस ट्रेनची वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. अनेक रेल्वे ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.
अनेक रेल्वे या कजर्त पनवेल मार्गे वळवण्यात आल्या आहेत. Pune - NZM DURANTO EXP, CSMT - MAS Express JCO, CSMT - Solapur Vande Bharat Exp, YB-CSMT MUMBAI EXP, SUR - CSMT VandeBharat , CBE - LTT Exp, YPR-BME AC EXP यासह अनेक एक्सप्रेस ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे. याचा मोठा फटका रोज मुंबई पुणे असं अप डाऊन करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. अनेक पुणेकर हे मुंईत अडकले आहेत. तर काही एक्सप्रेस दिवा पनवेल मार्गे वळवण्यात आल्या आहेत.