...म्हणून बाळासाहेब थोरात पालकमंत्रिपद स्वीकारणार नाहीत

मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेसमधील अनेक आमदार नाराज

Updated: Jan 5, 2020, 11:24 AM IST
...म्हणून बाळासाहेब थोरात पालकमंत्रिपद स्वीकारणार नाहीत title=

मुंबई : महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे पालकमंत्रिपद स्वीकारणार नाही आहेत. काँग्रेसच्या वाट्याला १० पालकमंत्री आल्यानं इतर मंत्र्यांना संधी मिळावी यासाठी थोरात पालकमंत्रिपद स्वीकारण नाहीत. खातेवाटपात काँग्रेसला मनासारखी खाती मिळालेली नाहीत. त्यामुळे अनेक मंत्री नाराज आहेत. त्यामुळे काही प्रमाणात नाराजी दूर करण्यासाठी स्वत: बाळासाहेब थोरातांनीच आता पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता आहे.

महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ही गेले अनेक दिवस मंत्रिमंडळ विस्तार, त्यानंतर खातेवाटप रखडलं होतं. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाविकासआघाडीचं सरकार स्थापन केलं. सुरुवातीला शपथविधीही मोठ्या उत्साहात पार पडला. पण त्यानंतर मंत्रिमंडळविस्तार आणि खातेवाटपाला मात्र उशीर झाला. खातेवाटपानंतर अनेक नेत्यांची नाराजी समोर आली. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपुढे आमदारांची नाराजी दूर करण्याचं आव्हान उभं राहिलं. 

काँग्रेसला अजून खात्यांची अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी आधी दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली. काँग्रेस अजून खाती मिळावी म्हणून आग्रही होती. पण सध्या तरी काही नेते हे नाराज आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात नाराज आमदारांची नाराजी दूर कशी केली जाते हे पाहावं लागेल.