close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बदलापूर बारवी धरणाची उंची ४ मीटरने वाढवली

बारावी धरण नवीन क्षमतेनुसार १०० टक्के भरले

Updated: Sep 16, 2019, 07:26 PM IST
बदलापूर बारवी धरणाची उंची ४ मीटरने वाढवली

बदलापूर : बदलापूर जवळील महाराष्ट्र औद्योगिक विकास महमंडळाच्या बारवी धरणाची उंची ४ मीटरने वाढवण्यात आली आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पहिल्याच वर्षी बारावी धरण नवीन क्षमतेनुसार १०० टक्के भरले आहे. मात्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम कारभारमुळे धरणातील अतिरिक्त पाण्यापासून बदलापूरकर वंचित राहणार असल्याचा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. 

बदलापूर शहारा साठी बारावी धरणातून ५० एम एल डी पाण्याचे आरक्षणास मुख्यमंत्र्यांनी तत्त्वता मान्यता दिली होती. मात्र पाणी वितरण करण्यासाठी लागणारी व्यवस्था तयार करण्यात जीवन प्राधिकरण अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे आता यंदाच्या वर्षी बदलापूरकरांना बारवी धरणातील अतिरिक्त पाणी मिळणार नाहीये, आधीच पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या बदलापूरकरांसाठी हा मोठा धक्का आहे.