मुंबई : गाडीत पेट्रोल भरल्यानंतर तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट करत असाल तर जरा सावधान राहा. मुंबई पोलिसांच्या 8 गुन्हे शाखेने एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय. पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरल्यानंतर त्याचे पैसे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यासाठी एटीएम किंवा डेबिट कार्ड वापरणाऱ्या नागरिकांना लुटणाऱ्या टोळीस अटक करण्यात आले.
ज्या एटीएम कार्डचा वापर पेमेंट करण्यासाठी केला गेला त्याचे एटीएम कार्ड क्लोनिंग करून त्याच्या माध्यमातून लाखो रुपयांची लूट करत असे. याविषयी तक्रार दाखल झाल्यामुळे तपास करत असताना ही धक्कादायक माहिती समोर आली यांनी चार व्यक्तींना अटक केल्याचे गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी दोन आरोपी हे पेट्रोल पंप वरती पेमेंट करण्यासाठी देण्यात आलेल्या एटीएम कार्ड चा डाटा चोरायचे. कार्ड क्लोनिंगच्या माध्यमातून सोडलेला डाटा हा इतर दोन आरोपींना सोपवला जायचा त्यानंतर या एटीएमच्या डेटाच्या माध्यमातून दुसरे एटीएम तयार करून वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून अनेकांचे पैसे काढण्यात आले होते.
त्यामधल्या चारही आरोपींनी संगनमताने हे रॅकेट चालवले होते. पेट्रोल पंपावर एटीएम डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे भरणे किती महाग होऊ शकतं ? याचं हे उदाहरण आहे.
त्याचबरोबर एटीएमचे कार्ड साठी वापरण्यात येणाऱ्या मॅग्नेटिक कार्डरीडर, सिम कार्ड, एटीएम कार्ड, इंटरनेटचा डोंगल आणि इतर टेक्निकल साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलय.. त्या प्रकरणानंतर तुम्ही जर पेट्रोल पंपावर एटीएम किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून पेट्रोल भरत असाल तर ही विशेष काळजी करून घेणे गरजेचे आहे.