close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर शिवसेनेच्या वाटेवर

 राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

Updated: May 22, 2019, 01:28 PM IST
राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर शिवसेनेच्या वाटेवर

बीड : बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. जयदत्त थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्षांकडे आमदार पदाचा राजीनामा सोपवणार आहेत. यावेळी शिवसेना नेतेही हजर राहणार आहेत. 

लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत सत्ता स्थापनेचा निकाल एक्झिट पोलमध्ये दिसत असल्याने सेनेच्या गोटात आनंद आहे. आता सेनेतर्फे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या तयारीत राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यात शिवसेनेला यश आले आहे. जयदत्त क्षीरसागर हे काही वेळात सेनेत प्रवेश करतील. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जयदत्त यांचा शिवसेना प्रवेश होणार आहे.