...म्हणून ऊसतोड कामगारांना कोरोनाची लागण नाही

कोरोना विषाणूचा संसर्ग अगदी झपाट्यानं पसरु लागला असतानाच... 

Updated: Jun 10, 2020, 01:06 PM IST
...म्हणून ऊसतोड कामगारांना कोरोनाची लागण नाही  title=

मुंबई : Croronavirus कोरोना व्हायरस सर्वत्र थैमान घालत असतानाच इथं महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुळात कोरोनाशीच संबंधित असल्यामुळं या बातमीचं महत्त्वंची अधिक आहे. जिथं कोरोना विषाणूचा संसर्ग अगदी झपाट्यानं पसरु लागला आहे, त्याच ठिकाणी बीडमध्ये परराज्यातून आलेल्या काही मंडळींना कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

ऊस तोडणीच्या कामासाठी म्हणून परराज्यात आणि राज्याच्या विविध भागांमध्ये गेलेले काही ऊस तोडणी कामगार बीडमध्ये परतले आहेत. पण, ते कोरोनाचं संकट फार मागेच सोडून आले आहेत. त्यामुळं जिल्हा प्रशासनासाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरी तणावग्रस्त परिस्थितीत जवळपास दीड लाख ऊस तोडणी कामगार बीडमध्ये परतले आहेत. कोरोनाचे रुग्ण असणाऱ्या जिल्ह्यात वावर असूनही या कामगारांना काही कोरोनाची लागण झाली नाही. लॉकडाऊननंतरच्या काळात ही कामगार मंडळी त्यांच्या मूळ गावी परतली. जिथे त्यांनी नियमावलीनुसार क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला. 

पाहा : कौतुकास्पद! गर्भवती हरिणीला वाचवण्यासाठी जवानाची नदीत उडी

 

परिस्थिती नियंत्रणात असताना पाहून आता आपल्याच गावात राहून मिळेल ते काम करुन, चटणी- भाकर खावून इथेच राहण्याचा निर्णय या कामगारांनी घेतला आहे. मुळात मोठ्या प्रमाणावर मेहनत करणाऱ्या ऊतसोड कामगारांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्यामुळं त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. शिवाय कोरोनाबाधित व्यक्तीच्या थेट संपर्कात न आल्यामुळं कामगारांना या विषाणूची लागण झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब ऊसतोड कामगारांना कोरोना शिवूही शकला नसल्यामुळं जिल्हा आरोग्य यंत्रणेचा जीव भांड्यात पडला आहे. संकटाच्या या प्रसंगात त्यांच्यासाठी ही अर्थातच एक मोठी बाब ठरत आहे