मुंबई : दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याबाबत आज माहिती मिळणार आहे. आज बोर्डाची महत्त्वाची पत्रकार परिषद आहे. यामध्ये बोर्ड दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत मोठा निर्णय घेणार आहेत.
दहावी आणि १२ वीच्या बोर्डाची परीक्षा घेण्यासंदर्भात आज बोर्ड पत्रकार परिषद घेणार आहे. यात परीक्षेच्या नियोजनाबाबत माहिती देण्यात येणार आहे.
बोर्ड ऑफलाईन परीक्षा घेण्यावर ठाम आहे. त्याबाबत यापूर्वीच नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज याची औपचारिक घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यातल्या काही शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी चिथावणीला बळी पडून ऑनलाईन परीक्षेची मागणी केली. मात्र सरकार ऑफलाईन परीक्षा घेण्यावर ठाम आहे.
मुंबई, नागपूर, औरंगाबाद यासारख्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षांची मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले. मुंबईत हिंदुस्थानी भाऊने विद्यार्थ्यांना चिथवली. हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन केले.
यासंदर्भात हिंदुस्थानी भाऊला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.