Big News : लोणावळा, मावळमध्ये पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी; अवघ्या काही तासांतचा पुन्हा का घेतला प्रवेश बंदीचा निर्णय?

पुणे जिल्ह्यात मावळ आणि मुळशी तालुक्यात पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे.  मावळ प्रांताधिका-यांनी आदेश जारी केले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Jul 28, 2024, 09:06 PM IST
Big News : लोणावळा, मावळमध्ये पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी; अवघ्या काही तासांतचा पुन्हा का घेतला प्रवेश बंदीचा निर्णय? title=

Lonavala Tourist Places : लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर बंदी बंदी हटवण्यात आली. आजपासून म्हणजेच 28 जुलै पासाून पुन्हा पर्यटकांना येथे प्रवेश देण्यात आला. मात्र, अवघ्या तासांतच  प्रवेश बंदीचा निर्णय मागे घेण्यात आला. आता पुन्हा एकदा लोणावळा, मावळमध्ये पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

मावळ आणि मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आलीये.  पर्यटन स्थळांवर जायला नागरिकांना मनाई करण्यात आली आहे.  मावळच्या प्रांताधिकाऱ्यांनी हा नवा आदेश जारी केला आहे. पुणे जिल्ह्यात आज ऑरेंज तर उद्या यलो अलर्ट देण्यात आलाय.  कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे.

मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवरची बंदी उठवल्यानंतर भुशी धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली. रविवारचा मुहूर्त साधत भुशी धरणावर वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले होते.   26 जुलै पासून लोणावळा व मावळ तालुक्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. धरण व धबधबे परिसरातून वाहणारे पाणी हे देखील कमी झाले असल्याने, सदरचा प्रतिबंधात्मक आदेश आज 27 जुलै रोजी रात्री बारापासून शिथिल करण्यात आला असल्याचे सुधारित पत्रक मावळ मुळशीचे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांनी काढले होते. मात्रस पुन्हा एकदा येथे पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या आदेशामुळे पर्यटन स्थळांवरील लहान मोठे व्यवसायिक टुरिस्ट व रिक्षा व्यवसायिक नाराज झाले आहेत.

मावळमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं इंद्रायणी आणि पवना नदी दुथडी भरून वाहतायेत... त्यामुळे पर्यटकांना या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 29 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आलीये.. पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील पर्यटक सर्व आदेश झुगारून वर्षाविहार करण्यासाठी कुंडमळा परिसरात येतायेत.