Big News : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे 'मनसे' भिडणार; जाहीर केली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार देखील निवडणूक लढवणार आहेत. मनसेने उेमदवारांची यादी जाहीर केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 23, 2024, 07:20 PM IST
Big News : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे 'मनसे' भिडणार; जाहीर केली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी  title=

Raj Thackeray Maharashtra Navnirman Sena : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळणार आहेत. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नव निर्माण सेना थेट निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उतरवणार आहे.  विधानसभा निवडणुकीत मनसे जवळपास 250 जागा लढवणार आहे. मुंबईतील सांभाव्य उमेदवारांची यादी मनसेने यापूर्वीच जाहीर केली होती. यानंतर आता मनसेने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.   

विधानसभा निवडणुक स्वबळावर लढण्याची घोषणा मनसे ने केली आहे. राज्यभरात 225 ते 250 जागा लढवण्याचा निर्धार मनसेने केला आहे. संभाव्य उमेदवारांना आपल्या मतदार संघात कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  राज ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता महाराष्ट्र दौरा करत आहेत. मराठवाडा दौरा झाल्यानंतर आता विदर्भ दौऱ्यावर आहेत. यादरम्यान मनसेने आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंची मोर्चेबांधणी सुरु केलीये. यवतमाळच्या वणी मतदार संघात मनसेचा उमेदवार जाहीर करण्यात आलाय. राजू उंबरकरांना मनसेकडून उमेदवारी दिली असून वणीतील सभेत राज ठाकरेंनी ही घोषणा केलीये..
मुंबईतील शिवडी मधून बाळा नांदगावकर, पंढरपूर मधून दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीण मतदारसंघातून संतोष नागरगोजे, हिंगोलीतून प्रमोद उर्फ बंडू कुटे, चंद्रपूर येथून मनदीप रोडे,  राजुरा मतदार संघातून सचिन भोयर यांना उेमदवारी देण्यात आली आहे. 

मनसेचे इतर सांभाव्य उमेदवार

कोकण, ठाणे पुणे तसेच कोकणातील खेड-दापोली-मंडणगड विधानसभा जागेसाठी वैभव खेडेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर, भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शैलेश बिडवे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. नवी मुंबई विधानसभा मतदारसंघातून गजानन काळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात साईनाथ बाबर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
मनसेच्या मुंबईतील 36 पैकी 16 संभाव्य उमेदवारांची यादी 
शिवडी - बाळा नांदगावकर
भायखळा - संजय नाईक
वरळी - संदीप देशपांडे
माहीम - नितीन सरदेसाई
चेंबूर - माऊली थोरवे
घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल
विक्रोळी - विश्वजित ढोलम
मुलुंड - सत्यवान दळवी/राजेश चव्हाण
भांडुप - शिरीष सावंत/योगेश सावंत/संदीप जळगावकर/अतिषा माजगावकर
कलिना - संदीप हटगी/संजय तुरडे
चांदिवली - महेंद्र भानुशाली
जोगेश्वरी - शालिनी ठाकरे
दिंडोशी - भास्कर परब
गोरेगाव - वीरेंद्र जाधव
वर्सोवा - संदेश देसाई
मागाठणे - नयन कदम