व्यापाऱ्यांचं भांडण, ग्राहकांचा लाभ; कांदा खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड

कांदा खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी

Updated: Dec 20, 2020, 05:30 PM IST
व्यापाऱ्यांचं भांडण, ग्राहकांचा लाभ; कांदा खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड title=

सांगली : सांगली जिल्ह्यात कांद्याचे दर ४० रूपये किलो तर टोमॅटोचे दर १५ रूपये किलो आहेत. मिरजेत मात्र एका व्यापाऱ्यानं ईर्शेपोटी चक्क दोन रूपये किलोनं कांदा विकला. त्यामुळे ग्राहकांची मोठी झुंबड उडाली. मात्र या ईर्शेतून व्यापाऱ्यांमध्येच भर बाजारात राडा झाला. 

नेहमी टोमॅटो विकणारा त्यानं कांदा विकायला घेतला. त्यामुळे दुसऱ्या कांदा विक्रेत्या व्यापाऱ्यानं थेट ग्राहकांना दोन रूपये किलोची ऑफर दिली. या इर्शेतून ग्राहकांचा मात्र चांगलाच फायदा झाला.

सध्या कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे भाव गेल्या 1 महिन्याच्या तुलनेत कमी झाले आहेत. शंभरीपर्यंत जावून आलेला कांदा 40 रुपयांपर्यंत आला असला तरी येत्या काळात कांद्याचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

नवीन गुलाबी कांदा बाजारात आल्याने जुन्या कांद्याचे भाव ही कमी झाले आहेत.