चंद्रपूरच्या भाजप नगरसेवकांमध्ये पर्यटनस्थळावरून मतभेद

पर्यटनस्थळावरून नगरसेवकांमध्ये मतभेद

Updated: Nov 17, 2019, 11:02 AM IST
चंद्रपूरच्या भाजप नगरसेवकांमध्ये पर्यटनस्थळावरून मतभेद title=

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका महापौरपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी भाजप आपल्या नगरसेवकांना सहलीला पाठवत आहे. मात्र पर्यटनस्थळावरून मतभेद झाले. महिलांना धार्मिक स्थळ तर पुरुषांना गोव्याचा आनंद घ्यायचा होता ते देखील विमानानं.... मात्र सगळ्यांच्या पदरी निराशा आली. आता गोव्याऐवजी हे विमान हैद्राबाद किंवा पेंच अभयारण्याकडे वळवण्यात येणार आहे. 

66 सदस्यांच्या चंद्रपूर मनपात भाजपला 37 सदस्यांसह स्पष्ट बहुमत आहे. तरीही नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा पराभव बघावा लागला होता. त्यातच महापौर पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू असल्यानं पक्षानं कोणतीही रिस्क घ्यायची नाही, असं ठरवलं. त्यासाठी बहुमत असूनही पर्यटनाचा मार्ग अवलंबल्याचं बोललं जात आहे. मोट बांधून ठेवत सत्ता स्थापन करणे भाजप श्रेष्ठींपुढे मोठे आव्हान असणार आहे. 

राज्यभरातील २७ महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. ज्यामध्ये चंद्रपूर मनपासाठी खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेवकासाठी आरक्षण असणार आहे. महापालिकेत भाजप बहुमतात आहे. भाजपमधील नगरसेवक यामुळे आता महापौरपदासाठी प्रयत्नात आहे. चंद्रपुरात सलग चौथ्यांदा महापौरपदासाठी महिलेची निवड होणार आहे. याआधी काँग्रेसच्या संगीता अमृतकर, भाजपच्या राखी कंचर्लावार आणि विद्यमान महापौर अंजली घोटेकर यांनी महापौरपदाची धुरा याआधी सांभाळली होती. आता पुन्हा एकदा महिला महापौर होणार आहे.

भाजपमध्ये काही जण इच्छूक असल्याने नाराज होऊन पक्ष विरोधात जावू नये म्हणून भाजपने काळजी घेत नगरसेवकांना अज्ञातस्थळी पाठवलं आहे.