किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

 १२ हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप 

Updated: Oct 23, 2020, 04:33 PM IST
किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. कोविड मृत्यू घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीची जमीन कोणी घेत नव्हतं, म्हणून मुलुंडमध्ये त्या जागेवर कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतल्याचे सोमय्यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी संबंधित व्यक्तिला फायदा करून दिला असून हा १२ हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप सोमय्यांनी केला.

मे २०२० मध्ये मुंबईत मृत्यूचा आकडा दाखवण्यात मुंबई पालिकेने गडबड केली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 

मुंबईत मृत्युदर हा दर महिन्याला सरासरी ७ ते ८ हजार असतांना मे महिन्यात मात्र हा मृत्यूदर १४ हजार एवढा दाखवण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.