शरद पवार यांची मोठी खेळी! अजित पवार, देवेंद्र फडणवीस दोघांचे टेन्शन वाढले

Maharashtra Politics : येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.  देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक समरजितसिंह घाटगे भाजप पक्ष सोडणार आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Aug 21, 2024, 06:52 PM IST
शरद पवार यांची मोठी खेळी! अजित पवार, देवेंद्र फडणवीस दोघांचे टेन्शन वाढले   title=

Samarjeet Ghatge : कोल्हापुरात भाजपला खिंडार पडायला सुरुवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक इच्छुकांची गोची होत असल्याने,  आजी-माजी पदाधिका-यांचे राजीनामा सत्र सुरू आहे... भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे पक्ष सोडणार ही चर्चा असताना,  भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

भाजप नेते समरजित घाटगे लवकरच भाजपला रामराम ठोकणार असल्याचं समजतंय. कागलमधून पुन्हा एकदा हसन मुश्रीफांना उमेदवारी देण्याची घोषणा अलिकडेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली.. त्यामुळं त्यांचे कट्टर विरोधक असलेले समरजित घाटगे अस्वस्थ झालेत... देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक ही घाटगेंची ओळख... मात्र आता त्यांनाच आपल्या पक्षात घेण्याची मोठी खेळी शरद पवार खेळतायत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय...

घाटगेंच्या हाती 'तुतारी'?

मुश्रीफांच्या विरोधात समरजीत घाटगे तुतारी हाती घेणार असल्याचं समजतंय.. सप्टेंबरमध्ये ते राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  येत्या 23 ऑगस्टला घाटगेंनी कागलमध्ये शाहू सहकारी साखर कारखान्यात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात घाटगे आपली भावी राजकीय दिशा जाहीर करणार असल्याचं समजतंय. साथ जनतेची... साथ आपल्या माणसांची.. चला..परिवर्तन घडवूया ! अशी पोस्ट  समरजित घाटगे यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे. 

दरम्यान, समरजित घाटगेंची समजूत काढण्याचा खटाटोप भाजप नेत्यांनी सुरू केलाय... काही ठिकाणी आम्ही उमेदरी देऊ शकत नाही अशा ठिकाणी आमचे नेते विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात येतात  पण महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही त्यांना सन्मान देऊ, आमच्याकडुन प्रयत्न सुरू आहे. आमच्या नेत्यांना आम्ही विनंती करणार आहोत की असे निर्णय तुम्ही घेऊ नका असे भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

दुसरीकडं भाजपला दुसरा मोठा धक्का बसलाय.. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठवून दिलाय.  राहुल देसाई हे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत. राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, पण विद्यमान आमदार प्रकाश अबिटकर यांनाच तिकिट मिळणार हे जवळपास निच्छित मानले जात आहे. त्यामुळे त्यांनी भाजपाला रामराम केले आहे.