Pune Devendra Fadnavis: लोकसभा निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्या. महाराष्ट्रात देखील भाजपला मोठा फटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह मित्रपक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पुण्यात आज भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा भाजपच्या अधिवेशनात उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या अधिवेशनात बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता आदेश नाही, मैदानात उतरा अन् ठोकून काढा. असा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या महाअधिवेशनात बोलत होते. विरोधक खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत. विरोधक म्हणतात की सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. त्यावर आम्ही विरोधकांना 2013 च्या सिलिंडरच्या किमती दाखवल्या. सध्याच्या किमतीपेक्षा त्या अधिक आहेत. त्यामुळे या किमती दाखवल्यानंतर विरोधक शांत बसतात. सध्या मी आत्मचिंतन करत आहे. सर्वांना उत्तर देता येतं. पण प्रत्येकजण आदेशाची वाट पाहत असतो. त्यामुळे आदेश आला तर उत्तर देऊ. नाहीतर उत्तर देणार नाही असे म्हणतो. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विधानसभेसाठी भाजपाचा नवा प्लॅन!
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या. या पराभवानंतर भाजपने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. सध्या भाजप आणि मित्रपक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. आज पुण्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, आज तुम्हाला परवानगी देतो. ज्याला बँटिंग करायची आहे, त्यांनी करा. मैदानात उतरा. पण अट एकच आहे की, हीट विकेट व्हायचं नाही.
काही लोक बोलायला उतरले की ते समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. त्यामुळे त्यांना चार दिवस आधीच उत्तरं द्यावी लागतात. त्यामुळे आता बाकीचे आदेश विचारू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा. तुम्हाला खोटं बोलायचं नाही. खरं बोलायला विचार करावा लागत नाही. विरोधकांना खोटं बोलायचं आहे. मात्र, तुम्हाला खरं बोलायचं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आता मैदानात उतरले पाहिजे. असा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
विरोधकांचा योजना बंद करण्याचा डाव
महाविकास आघाडीचा इतिहास हा योजना बंद करण्याचा आहे. भाजप सरकारच्या सगळ्या चांगल्या योजना महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात बंद केल्या. ज्यामध्ये जलयुक्त शिवार आणि मेट्रो सारख्या योजनांचा समावेश आहे. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.