पलूस - कडेगाव पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून देशमुखांचा अर्ज दाखल

शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्यामुळे आता देशमुख आणि कदम यांच्यात थेट लढत होणार आहे. 

पलूस - कडेगाव पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून देशमुखांचा अर्ज दाखल  title=

मुंबई : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संग्रामसिंह देशमुख हे सांगली जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत. तर माजी आमदार संपतराव देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत. काँग्रेसकडून विश्वजित कदम रिंगणात आहेत. यामुळे देशमुख आणि कदम घराण्यामध्ये ही लढत रंगणार आहे. विश्वजित कदम हे युवक प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. विश्वजित कदम हे माजीमंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार मोहनराव कदम यांचे विश्वजित हे पुतणे आहेत. शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्यामुळे आता देशमुख आणि कदम यांच्यात थेट लढत होणार आहे.