'कन्नडिगांच्या राड्यामागे काँग्रेस-जेडीएसचा हात' भाजपाचा गंभीर आरोप

बेळगावमध्ये कन्नड वेदिका संघटनेकडून धुडगूस, महाराष्ट्राच्या गाड्यांवर दगडफेक...  कन्नगडिगा वेदिकेच्या राड्यामागे मागे Congress आणि जेडीएसचा JDS हात 

Updated: Dec 6, 2022, 06:21 PM IST
'कन्नडिगांच्या राड्यामागे काँग्रेस-जेडीएसचा हात' भाजपाचा गंभीर आरोप title=

Maharashtra Politics : कर्नाटकामध्ये महाराष्ट्रातील गावे सामील करून घेण्याचा निर्णयावर कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बोम्मई (Basawraj Bommai) सातत्याने वक्तव्य करत आहेत. त्यातच महाराष्ट्रातील (Maharashtra) दोन मंत्र्यांना कर्नाटकात मध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आल्यानंतर सीमा प्रश्न (Border Issue) चांगलाच तापलेला आहे. आज कन्नड वेदिका रक्षिता संघटनेकडून (Kannada Rakshana Vedike) सीमा भागामध्ये महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक करण्यात आली, तसंच महाराष्ट्रविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाले असून पुण्यात कर्नाटकच्या गाड्यांवर काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा काम हे सुरू आहे. 

भाजपाचा गंभीर आरोप
दरम्यान, सिमावादावर सुरू असेलेल्या कन्नगडिगा वेदिकेच्या राड्यामागे मागे कांग्रेस (Congress) आणि जेडीएसचा (JDS) हात असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत सवाल उपस्थित केले. सत्तेत असताना शांत बसणाऱ्यांना आता कंठ कसा फुटला? असा प्रश्ना उपाध्ये यांनी ठाकरेंना विचारला. 

जनादेश खुंटीवर टांगून बळकावलेली सत्ता गेल्यामुळे नैराश्य आलेल्या मविआला आता विरोधकांची भूमिकाही जमत नाही. त्यातुनच मविआने 17 डिसेंबरचा मोर्चा घोषित केल्याची टीका केशव उपाध्ये यांनी केला आहे. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राला संकटांच्या खाईत ढकलणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता सीमावादावर कंठ फुटला आहे, सत्तेत असताना वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित करण्याची त्यांनी मागणी केली होती, तेव्हा हे उसनं अवसान कुठे गेलं होतं, असा सवालही केशव उपाध्ये यांनी केला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
मुख्मंत्र्यांनी सीमावादावर मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावलीय. या बैठकीला सीमावादावर स्थापन केलेल्या समितीचे सदस्य आणि मंत्री चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) उपस्थित आहेत. तसंच उद्योगमंत्री उदय सामंतही (Uday Samant) या बैठकीला हजर आहेत. सीमावादावर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी चर्चा करण्याची तयारी असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

'आता अॅक्शनला रिअॅक्शन येऊ शकते'
कोणी कायदा हाती घेत असेल तर आमच्याही संयमाला मर्यादा आहेत असं महाराष्ट्राचे उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी खडसावलं आहे. महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतलीय. पण अॅक्शनला रिअॅक्शन येऊ शकते असं शंभूराज देसाईंनी ठणकावलं. तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारकडे केलीय असं शंभूराज म्हणाले. 

शरद पवार यांचा इशारा
बेळगावातील कन्नडिगांच्या राड्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय... पुढच्या ४८ तासांमध्ये हे सर्व थांबलं नाही तर आपण स्वत: बेळगावात जाणार असल्याचं अल्टिमेटम पवारांनी कर्नाटक सरकारला दिलंय. तसंच पुढे जे काही होईत त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील असंही त्यांनी बजावलंय.  बोम्मईंच्या चिथावणीखोर भाषेमुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही पवारांनी केलाय. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना फोनवरून संपर्क साधला, पण उपयोग झाला नाही, असं सांगतानाच केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याची टाकी त्यांनी केली.