सांगलीत धोका असल्याने भाजपची सावध भूमिका, प्रदेशाध्यक्षांनी बोलावली बैठक

महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापनेच्या हालचालीमुळे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा सत्तांतर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील सव्वा वर्षानंतर नाराजीचा फटका बसू नये म्हणून भाजप सांगली महापालिकेतील महापौर बदलण्याची हालचाली करत आहे.

Updated: Nov 22, 2019, 01:44 PM IST
सांगलीत धोका असल्याने भाजपची सावध भूमिका, प्रदेशाध्यक्षांनी बोलावली बैठक title=

सांगली : महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापनेच्या हालचालीमुळे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा सत्तांतर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील सव्वा वर्षानंतर नाराजीचा फटका बसू नये म्हणून भाजप सांगली महापालिकेतील महापौर बदलण्याची हालचाली करत आहे, आज त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे नगरसेवकांची बैठक घेत आहेत. तर सांगली जिल्हा परिषदेत भाजपला काठावरच बहुमत आहे. मात्र इथं शिवसेना, अजितराव घोरपडे गट (सध्या शिवसेना), आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य जर बाजूला गेले तर भाजपची सत्ता संपुष्ठात येऊ शकते.

भाजप २५, अधिक शिवसेना ३, रयत विकास आघाडी ४ अधिक घोरपडे गट २,  अधिक स्वाभिमानी शेतकरी संघटना १ अधिक भाजपचे ३५  संख्यबळ आहे. तर कांग्रेस १० अधिक राष्ट्रवादी १४ अधिक अपक्ष १ अस काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच २५ इतक संख्याबळ झाले आहे. दरम्यान, शिवसेना ३, घोरपड़े गट २ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना १ हे ६ सदस्य विरोधात गेले तर भाजपाची सत्ता संपुष्ठात येऊ शकते.

भाजपला लातूर महापालिकेत आणि उल्हासनगर महापालिकेत मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी भाजपकडे बहुमत असताना सत्तांतर घडून आले आहे. लातूरमध्ये काँग्रेसचा महापौर तर उल्हासनगरमध्ये अनपेक्षित शिवसेनेचा महापौर बसला आहे. राज्यातील घडामोडीचा भाजपला फटका बसताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवी समीकरणे दिसून येत आहे. महाविकासआघाडी झाली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे पक्ष एकत्र आलेत. तिच  परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने आतापासून सावध भूमिका घेत आहे.