शास्त्रीनगर गावाचा डोळस निर्णय, अंध तरुणीची लोकप्रतिनिधी म्हणून निवड

राजकीय क्षेत्रात एखादा अंध लोकप्रतिनिधी तुम्ही पाहिलाय का.. नाही ना.. मात्र नांदगाव तालुक्यातील शास्त्रीनगर गावाने डोळस निर्णय घेत एका अंध तरुणीची लोकप्रतिनिधी म्हणून निवड केलीये.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 8, 2018, 11:52 AM IST
शास्त्रीनगर गावाचा डोळस निर्णय, अंध तरुणीची लोकप्रतिनिधी म्हणून निवड title=

मनमाड : राजकीय क्षेत्रात एखादा अंध लोकप्रतिनिधी तुम्ही पाहिलाय का.. नाही ना.. मात्र नांदगाव तालुक्यातील शास्त्रीनगर गावाने डोळस निर्णय घेत एका अंध तरुणीची लोकप्रतिनिधी म्हणून निवड केलीये.

पूजा कचरु मुंजाळची ग्रामपंचायतीत सदस्यपदी बिनविरोध निवड करत जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अनोखा आदर्श समाजापुढे ठेवलाय. लहानपणी गोवर झाल्याने पूजाला अंधत्व आली पण ती डगमगली नाही, पूजाचं आता महाविद्यालयीन शिक्षण सुरु आहे. पूजाला दृष्टी नसली तरी दृष्टीकोन आहे. तसचं शास्त्रीनगरच्या गावकऱ्यांचही कौतुकचं.

महिलांना समानतेची वागणूक देण्याच्या मोठ्या गप्पा केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र अनेकदा महिलांना डावलण्यात येते. शास्त्रीनगर ग्रामपंचायतीने पूजासारख्या अंध तरुणीला गावगाडा हाकण्याची संधी देत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वेगळा आदर्श घालून दिला.