त्रंबकेश्वर ला ब्रह्मगिरी पर्वताचा धोका

माळीन दुर्घटनेची पुनरारुत्ती होण्याची शक्यता, नागरीकामध्ये भीती,

Updated: Jul 27, 2022, 08:17 PM IST
त्रंबकेश्वर ला ब्रह्मगिरी पर्वताचा धोका  title=
त्रंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वत

सोनू भिडे, नाशिक -   २०१४ साली पावसाळ्यात माळीनची दुर्घटना घडली होती. या घटनेला २६ जुलै ला एक वर्ष पूर्ण झाल आहे. याही वर्षी जुलै महिना संपण्याच्या आतच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वताला तडे गेले आहेत. यामुळे त्रंबकेश्वर येथे माळीन घटनेची पुनरारुत्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या वीस दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे भूस्खलन झाले आहे. काही भागात भूकंप तर काही भागात जमिनीला आणि रस्त्याला तडे गेल्याची घटना घडल्या आहेत. पेठ येथे भूकंप झाला आहे तर कसारा घाटात रस्त्याला तडे गेले होते. सुरगाणा येथे बंधारा फुटल्याने गाव वाहून गेल्याची घटना सुद्धा घडली आहे. 

ब्रम्हगीरीला गेले तडे

ब्रम्हगीरी पर्वताखाली त्रंबकेश्वर शहर वसले आहे. याठिकाणी आद्य ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वराचे मंदिर आहे. याठिकाणी भारतातून दर्शनासाठी भाविक येत असतात. तसेच निसर्ग सौदर्याचा आनंद सुद्धा घेत असतात. मात्र आता या ब्रम्हगिरी पर्वताचा धोका वाढला आहे. सततच्या पावसाने ब्रम्हगिरी पर्वताला तडे गेले असून भूस्खलन सुद्धा होत आहे. डोंगर वीस ते तीस फुट खाली खचला असल्याच मत नागरिकांनी व्यक्त केल आहे. 

गेल्या पाच ते सहा वर्ष्यापासून भूस्खलन होत आहे. दर वर्षी जमीनीला तडे जातात मात्र या वर्षी मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. कधीही डोंगर खाली येण्यची भीती या वर्षी जास्त भेगा संपूर्ण भाग खडकाळ असल्याने  पाऊसाचे पाणी जमिनीत मुरते यामुळे डोंगर कधीही खाली येण्याची भीती डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नागरिकांना आहे. प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

पेठ आणि सुरगाणा तालुक्यात भूकंप

पेठ तालुका आदिवासी भाग आहे याठिकाणी मोठ मोठे पर्वत आहे. सातच्या पावसाने याठिकाणी सुद्धा भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील घोटविहीरा आणि पिंपळपाडा या गाव नजीक असलेल्या डोंगरउतारावर जमीनीस भेगा पडल्या होत्या. यामुळे घोटविहीरा आणि पिंपळपाडा पाड्यातील नागरिक भयभीत झाले होते. यावेळी खबरदारी म्हणून सराव नागरिकांना शेजारील गावात स्थलांतरित करण्यात आले होते. तर काही ठिकाणी भुकंपाचे धक्के सुद्धा जाणवले आहेत.

कसारा घाटात रस्त्याला तडे
मुंबई आग्रा महामार्ग वरील कसारा घाटात भूस्खलन झाल्याने जमीन धसली आहे. डोंगरातून जाणाऱ्या या रसत्यावर सुद्धा याचा परिणाम दिसून आला आहे. घाटात रस्त्याला तडे गेल्याने काही वेळे करता हा महामार्ग बंद ठेवण्यात आला होता.