भररस्त्यात मृत्यूनं गाठलं, भरधाव एसटीचा बाईकला धडक, व्हिडीओ

भरधाव ST ची बाईकस्वाराला धडक, व्हिडीओ पाहून तुम्ही सांग चूक कोणाची?

Updated: Feb 14, 2022, 08:09 PM IST
भररस्त्यात मृत्यूनं गाठलं, भरधाव एसटीचा बाईकला धडक, व्हिडीओ title=

बुलढाणा : नागपूर-औरंगाबाद महामार्गावर एसटी बस आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. एसटी बसनं मोटारसायकलला धडक दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात अंगावर काटा आणणारा आहे. 

हा अपघात इतका भयंकर होता की एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर - औरंगाबाद हायवे असलेल्या अंढेरा फाटा येथे मोटारसायकल आणि एसटी बसचा अपघात झाला. 

या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून एक जखमी झाला आहे. अंढेरा फाट्यावर मोटारसायकल ही दुसऱ्या बाजूने वळण घेत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बस ने या मोटारसायकलला उडवलं. 

 मोटारसायकल आणि एक व्यक्ती बाजूला जाऊन पडली, तर उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमीला तात्काळ रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र ही संपुर्ण घटना cctv मध्ये कैद झाली आहे.