घर विकत घेताय? रस्ता कुणाच्या मालकीचा तेही विचारून घ्या...

या सोसायटीत घरं घेताना हा सोसायटीचा अंतर्गत रस्ता असल्याचं बांधकाम व्यावसायिकाकडून सांगण्यात आलं

Updated: Jul 5, 2019, 09:55 PM IST
घर विकत घेताय? रस्ता कुणाच्या मालकीचा तेही विचारून घ्या...  title=
प्रातिनिधिक फोटो

अश्विनी पवार, झी २४ तास, पुणे : घर घेताना बांधकामाचा दर्जा, सुखसोयी, विविध ठिकाणांशी कनेक्टिव्हीटी या मुद्द्यांचा विचार केला जातो. पण आता रस्ता कुणाचा आहे, तेही पाहून घ्या... आम्ही असं का सांगतोय, त्यासाठी तुम्हाला ही बातमी जाणून घ्यावी लागेल. रस्ता कुणाचा? असा वाद सध्या पुण्यातल्या ग्रीनलॅंड काऊंटी सहकारी सोसायटीमध्ये रंगलाय. हे रहिवासी सध्या पीएमआरडी प्रशासनाविरोधात उभे राहिलेत. कारण या सोसायटीला अंतर्गत रस्ता तोडण्यासाठी देण्यात आलेली नोटीस...

२००७ साली ग्रीनलॅंड काऊंटी गृहप्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली. या सोसायटीत घरं घेताना हा सोसायटीचा अंतर्गत रस्ता असल्याचं बांधकाम व्यावसायिकाकडून सांगण्यात आलं. पण आता हा रस्ता सार्वजनिक असल्याचं पीएमआरडीएचं म्हणणं आहे. तसंच ग्रीनलॅंड काऊंटीमधला हा अंतर्गत रस्ता नाही तर हा रस्ता सार्वजनिकच असल्याचा दावा शेजारच्या 'साद सोसायटी'मधल्या रहिवाशांचा आहे.  

हा रस्ता जर सार्वजनिक होता तर तो अंतर्गत रस्ता म्हणून वापरण्यास परवानगी दिलीच कशी? हा प्रश्न आहे. दोन्हीही सोसायटीमधील नागरिक आपल्या हक्कासाठी लढत आहेत. मात्र त्यांना जो मनस्ताप होतोय त्याला जबाबदार कोण? पालिका प्रशासन, बांधकाम व्यावसायिक की पीएमआरडीए? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतोय.