शेतकरी कर्जमाफीच्या लिंकवर कॅन्डी क्रश, आयुक्त सोनी निलंबित

सहकार आयुक्त सतीश सोनी यांना निलंबित करण्यात आले आहे.

Updated: Jan 22, 2020, 11:51 PM IST
शेतकरी कर्जमाफीच्या लिंकवर कॅन्डी क्रश, आयुक्त सोनी निलंबित

मुंबई : सहकार आयुक्त सतीश सोनी यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्य सरकारने ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील हलगर्जीपणा सोनी यांना भोवला आहे. शेतकरी कर्जमाफीची माहिती देणार्‍या वेबसाईटच्या लिंकवर क्लीक केल्यावर कॅन्डी क्रश हा गेम ओपन होत होता. ही लिंक सहकार विभागाकडून शेतकर्‍यांना एसएमएसद्वारे पाठवली गेली होती. 

किसान पोर्टलवरून शेतकरी कर्जमाफीची लिंक शेतकऱ्यांना एमएमएसद्वारे पाठवण्यात आली होती. लिंकवर क्लिक केल्यानंतर कॅन्डी क्रश गेम ओपन होत होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यामुळे शासनावर सर्व स्तरातून कडाडून टीका झाली. राज्य शासनाने याची गंभीर दखल घेत सोहनी यांना यासाठी जबाबदार धरत त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.