नवी मुंबईत कार शोरुमला मोठी आग, या महागड्या गाड्या जळून खाक

Car workshop on fire : तुर्भे एमआयडीसीत कारच्या शोरुमला मोठी आग लागली.  

Updated: Dec 8, 2021, 12:18 PM IST
नवी मुंबईत कार शोरुमला मोठी आग, या महागड्या गाड्या जळून खाक

नवी मुंबई : Car workshop on fire : तुर्भे एमआयडीसीत कारच्या शोरुमला मोठी आग लागली. या आगीत 40 ते 45 महागड्या कार जळून खाक झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Car workshop on fire at Turbhe MID in Navi Mumbai, 40-45 cars on fire)  शोरुमध्ये जवळपास 40 ते 45 कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यात. बीएमडब्ल्यू वर्कशॉपमधील ऑफिससह सर्व फर्निचर आणि कागदपत्रे देखील जळून खाक झाली आहेत.

तुर्भे एमआयडीसी तील एका कारच्या चार मजली शोरूममध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याने शोरूममधील 40 ते 45 महागड्या कार जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसली तरी, शोरुम पूर्णपणे जळून खाक झाले आहे. 

कोपरखैरणे, नेरूळ आणि शिरवणे येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या वाशी नेरूळ आणि सीबीडी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर येथील आग आटोक्यात आणली.

या आगीत बीएमडब्ल्यू वर्कशॉपमधील ऑफिससह सर्व फर्निचर आणि कागदपत्रे देखील जळून खाक झालीत. तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आगीबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.