Pune Accident News: पुण्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पाहा Video

CCTV Footage of Accident: दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सीसीटीव्हीच्या आधारावर दिसत आहे. अपघाताचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. (Latest Marathi News)

Updated: Jun 25, 2023, 08:31 PM IST
Pune Accident News: पुण्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पाहा Video title=
Pune Accident News CCTV Footage

Pune Accident News:  सोलापूर महामार्गावरील खेडेकर मळा परिसरात आयशर टेम्पो, चारचाकी कार आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झाल्याची (Pune Accident News) घटना घडली आहे. या अपघातात 2 गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर 7 जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सीसीटीव्हीच्या (CCTV Video) आधारावर दिसत आहे. अपघाताचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. (Latest Marathi News)

नेमकं काय झालं?

एक टेम्पो हा पुणे बाजूकडे निघाला होता. तर चारचाकी गाडी ही सोलापूरच्या निघाली होती. टेम्पोमध्ये बांधकामाच्या लोखंडी प्लेट होत्या. यावेळी टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि सोलापूरच्या (Pune Solapur Highway) बाजूने निघालेल्या चारचाकी गाडीवर जाऊन आदळला. हा तसेच बाजूने जाणाऱ्या एका दुचाकीलाला ही ठोकरलं. अपघात एवढा भीषण होता कि टेम्पो हा चारचाकी गाडीच्या बोनेटवर जाऊन थांबला. यावेळी गाडीत असलेल्या पती -पत्नी व त्यांच्या दोन मुलांना किरकोळ जखम झाली आहे तर टेम्पोतील दोघेजण गंभीर जखमी झाले असून दुचाकीवरील ही व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातग्रस्त व्यक्तींना कस्तुरी प्रतिष्ठान, लाईफ केअर रुग्ण वाहिकेच्या मदतीने उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल, सिध्दीविनायक हॉस्पिटल, झेड प्लस हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरातील व्यक्तींनी तातडीने धाव घेत लोकांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात पोहोचवलं. 

पाहा थरारक व्हिडिओ

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पावसाने (Pune Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे टॉफिकमध्ये देखील वाढ झाल्याचं दिसून येतंय. सोलापूर पुणे हायवेवर उरुळी कांचन (uruli kanchan) ते यवत पर्यंत मोठी गर्दी दिसून येते. हडपसरपासून यवतपर्यंत वाहनांची स्पीड कमी ठेवावी लागते. अशातच पावसामुळे वाहने अनियंत्रित झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाल्याचं देखील दिसून येतंय.