CCTV फुटेज : वसईत तरुणाला दगडाने ठेचण्याचा प्रयत्न

या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी तिघांना अटक केलीय

Updated: Oct 31, 2018, 11:57 AM IST
CCTV फुटेज : वसईत तरुणाला दगडाने ठेचण्याचा प्रयत्न  title=

वसई : वसईत एका तरुणाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. शनी शकर मल असं या तरुणाचं नाव आहे. दगडाच्या साहाय्याने मारहाण आणि धारदार शस्त्राने त्याचा गळा कापण्याचा प्रयत्न झाला. ही सगळी घटना सीसीटीव्हीत चित्रीत झालीय.

२३ ऑक्टोबरला या तरुणाला त्याच्या काही मित्रांनी वसई पूर्वेला बोलावले. मात्र त्यावेळी रात्री साडे अकरा वाजल्याच्या सुमारास ४ ते ५ जणांना त्याला जबर मारहाण केली. 

ही घटना घडत असताना या तरुणाच्या मदतीसाठी कुणीही पुढे सरसावले नाही. मारहाणीनंतर सगळे हल्लेखोर पसार झाले. 

या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी तिघांना अटक केलीय. शनीशंकरवर सध्या कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.