सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी लंडनमधील हवेली विकत घेतली असून ही डील जवळपास नक्की झाली आहे. Financial Times च्या वृत्तानुसार, लंडनच्या मेफेअर येथे ही हवेली आहे. ही हवेली तब्बल 25 हजार स्क्वेअर फुटांमध्ये विस्तारली आहे. लंडनमधील हा सर्वात महागडी घरविक्री ठरणार आहे.
लंडनच्या प्रसिद्ध हाइड पार्कजवळ असलेले Aberconway Houseहे 1920 च्या दशकातील घर आहे. या घराची विक्री तब्बल 138 दशलक्ष पौंड (अंदाजे 1,444.4 कोटी रुपये) मध्ये होणार असल्याचा अंदाज आहे. दिवंगत पोलिश व्यावसायिक जॅन कुल्झिक यांची मुलगी डोमिनिका कुल्झिक ही मालमत्ता अदर पूनावाला यांना विकणार असल्याची माहिती आहे. रिपोर्टनुसार, ही मालमत्ता पूनावाला कुटुंबाच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ब्रिटीश उपकंपनी सीरम लाइफ सायन्सेसद्वारे अधिग्रहित केली जाणार आहे.
या हवेलीच्या विक्रीसह ते लंडनमधील दुसरं सर्वात महाग घर ठरणार आहे. तर वर्षातील सर्वात मोठी डील असल्याचं Luxury Property च्या एजंट्सनी सांगितलं आहे. लंडनमधील घरांची विक्री सध्या घडली आहे. तज्ज्ञांच्या मते, लंडनमधील लक्झरी मालमत्तेवर जास्त कर्ज काढावं लागत असल्याने रिअल इस्टेट बाजार मंदावला आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने करोना काळात फार मोलाची भूमिका निभावली होती. सिरमने करोना लस कोविशिल्डची निर्मिती केली होती. AstraZeneca आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ही लस तयार केली होती. ही लस फक्त भारतच नाही तर भारताबाहेरही पाठवण्यात आली होती.
अदर पूनावाला हे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पूनावाला यांचे पुत्र आहेत. 2001 मध्ये अदर पूनावाला सिरमशी जोडले गेले आणि 2011 मध्ये सीईओ झाले.