Pankaja Munde Advise For Liqueur Consumption : राज्यात अनेक ठिकाणी दारु बंदी आहे. तर, अनेक ठिकाणी दारुबंदीची मागणी केली जात आहे. अशातच दारु पिणाऱ्यांना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक अजब सल्ला दिला आहे. दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका असं पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे. या अजब सल्ल्यामुळे पंकजा मुंडे चर्चेत आल्या आहेत.
गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडेयांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. बोलताना त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला आहे. दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका. त्याने विष बाधा होते. पिण्याला मी नाही म्हणत नाही असं देखील त्या म्हणाल्या.
तंबाखू खावून कुठेही थुंकू नका
तंबाखू आणि पुड्या खाणे बंद करा आणि खाऊन कुठेही थुंकू नका. त्याने कॅन्सर होतो. तसेच चांगलं चांगलं खा मास मच्छी व्हेजिटेरियन खा आणि हेल्दी रहा असा सल्ला देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच माझा एच बी 14 आहे मी हेल्दी आहे. मला वेळेवर कोणी जेवायला देत नाही तरीसुद्धा मी हेल्दी आहे. मला रक्ताची भीती वाटते. अस देखिल पंकजा मुंडे म्हणल्या.
पंकजा मुंडे परळी विधानसभा लढण्यास इच्छुक
काही दिवसांपूर्वी बीड लोकसभेची जागा पंकजा मुंडे लढवणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता परळी विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याचे संकेत पंकजा मुंडेंनी दिलेत. परळीच्या जागेचा निर्णय वरिष्ठ घेतील, असं विधान पंकजांनी केलंय. तर, फडणवीस आणि आपल्यात मतभेद असले तरी मित्रत्त्वाचे नातं असल्याचं त्यांनी नमूद केलं.
पंकजा मुंडे टाळ वाजवत भजनात तल्लीन
भाजपचे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्या. त्यांच्यासोबत खासदार प्रीतम मुंडे आणि महादेव जानकरही उपस्थित होते. यावेळी गोपीनाथ गडावर सुरू असलेल्या भजनामध्ये पंकजा मुंडे टाळ वाजवत तल्लीन झाल्या.